Minister orders strict action against 3 officers for negligence in work | Sarkarnama

गरिबांची कामे पेंडिंग ठेवणाऱ्या तीन अधिकाऱ्यावर कारवाईचे राज्यमंत्री बच्चू कडूंचे आदेश 

अरुण जोशी 
बुधवार, 1 जानेवारी 2020

गोरगरिबांची कामे महिनो न महिने पेंडिंग ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर सर्वत्र कारवाई होईल , असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे . 

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडूंचा धडाका सुरु झाला आहे.  पहिल्याच  दौऱ्यात तीन अधिकाऱ्यावर कारवाई  सेवा हमी कायद्या अंतर्गत कारवाई   करण्याचे आदेश त्यांनी दिले. गोरगरिबांची कामे महिनो न महिने पेंडिंग ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर सर्वत्र कारवाई होईल , असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे . 

 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अचानक नव्यानेच राज्यमंत्री झालेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोट येथे जात असताना दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे भेट दिली व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेतला. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांना काही समस्या असल्यास विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या असल्यास पुढे यायला सांगितले . 

तेव्हा तहसीलदार योगेश देशमुख उपविभागीय अधिकारी सौ प्रियंका आंबेकर यांच्या उपस्थितीत त्याच्या विविध कार्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यास सांगितले व त्यानुसार तहसील सभागृह मध्ये सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

संजय गांधी निराधार योजनेत अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा केल्यामुळे नायब तहसीलदार जयंत डोळे व् राशन कार्ड देण्यास टाळाटाळ करणाऱ्या  पुरवठा विभागातील प्रमोद काळे व सपना भोवते यांच्यावर सेवा हमी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश  बच्चू कडू यांनी दिले . 

 उद्या याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. पुरवठा विभागातील तक्रारीवरून सेवा हमी कायदा अंतर्गत अंमलबजावणी करणे गरजेचे असून त्याच कायद्या अंतर्गत जिल्ह्यात पहिली कारवाई झाल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख