मंत्री नितिन राऊत यांचे स्वागत कार्यकर्त्यांना पडले 55 हजारांत! 

Minister Nitin Raut welcome costs party worker for Rs 55 thousand
Minister Nitin Raut welcome costs party worker for Rs 55 thousand

नागपूर : नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचे स्वागत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हिसका दाखवत पाकिट चोरी करीत जवळपास 55 हजार चोरले. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथग्रहण केल्यानंतर प्रथमच नितीन राऊत शहरात दाखल होत होते. त्यामुळे सोमवारी 12.30 च्या सुमारास हजारो कार्यकर्ते विमानतळावर जमले होते. मंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्ते त्यांचे स्वागत करीत होते. मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे जल्लोष सुरू होता. याचा फायदा घेऊन चोरट्याने कार्यकर्त्यांच्या खिशावर हात साफ केले.

नितीन राऊत यांचे कार्यकर्ते अजयकुमार श्रीचंद विश्वकर्मा आणि अरविंदसिंग सुरजितसिंग दिगवा (36, रा. वैशालीनगर) यांच्या खिशात 48 हजार सातशे रुपये होते. चोरट्याने त्यांच्या पॅंटच्या खिशातून पैसे व कागदपत्रे चोरली. मंत्र्यांसोबत कार्यकर्ते बाहेर पडले असता त्यांना काही वेळाने आपले पैसे कुणीतरी चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंत्र्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी विमानतळावर चोख सुरक्षाव्यवस्था असताना चोरट्याने पाकीट मारल्याची घटना समोर येताच लोकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com