जयंतरावांच्या ग्रंथतुलेत बसली एक लाखांची पुस्तके!

नाट्यमय राजकीय घडामोडीत महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि जयंत पाटील यांनी त्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांची इस्लामपूरमध्ये ग्रंथतुला करण्यात आली
Minister Jayant Patil Felicitated in Islampur
Minister Jayant Patil Felicitated in Islampur

इस्लामपूर  : एखाद्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपण फळांची, लाडूंची, जिलेबी, धान्याची, खोबरे आणि बऱ्याच गोष्टींची तुला केलेली आपण ऐकतो. इस्लामपुरात प्रतिराज युथ फौंडेशनच्या वतीने असाच एक अभिनव उपक्रम राबविला गेला ग्रंथतुलेचा आणि तोही आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी. निमित्त होते मंत्री जयंत पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात येण्याचे. आणि गंमत म्हणजे जयंत पाटील यांचे वजन भरले 113 किलो आणि यात सुमारे एक लाख रुपयांची पुस्तके भरली. ही पुस्तके वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी फौंडेशन पुढाकार घेणार आहे.

नाट्यमय राजकीय घडामोडीत महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि जयंत पाटील यांनी त्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. इस्लामपूर परिसर आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या अभिनंदनासाठी मुंबईला जाऊ लागले. त्यांचा ओघ पाहून मीच इस्लामपुरात येतो असे सांगून जयंतराव आठ डिसेंबरला इस्लामपुरात आले. प्रत्येकजण आपल्या नेत्याचे स्वागत अविस्मरणीय ठरावे अशा प्रयत्नात होता. युवक राष्ट्रवादीचे नेते खंडेराव जाधव यांनी जयंत पाटील यांना वाचनाची असलेली आवड विचारात घेऊन त्यांच्या वजनाइतकी पुस्तके वाचनालयाला देण्याचा निर्णय घेतला. 

त्या दिवशी गांधी चौकात प्रतिराज युथ फौंडेशनने जयंत पाटील यांची पुस्तकांची तुला केली. यात सुमारे एक लाख रुपये किमतीची साडे तीनशे पुस्तके भरली आणि जयंतरावांचे 'वजन'ही लोकांना कळले. 113 किलोची ही पुस्तके आता वाचनालयाच्या माध्यमातून वाचकांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

या उपक्रमात आयुब हवालदार, सदानंद पाटील, अॅड. जगदीश थोरात, प्रकाश जाधव, हमीद लांडगे, सुधीर पाटील, राजवर्धन लाड, रूपाली जाधव, नगरसेवक जयश्री पाटील, माजी नगरसेवक शुभांगी शेळके, मिनाज मुल्ला यांनी सहभाग घेतला.

नेते जयंत पाटील स्वतः वैचारिक पार्श्वभूमी असलेले नेतृत्व आहेत, चांगले वाचक आहेत. त्यांचा त्या तोडीचा सन्मान व्हावा; शिवाय पुस्तकांच्या माध्यमातून विधायक काहीतरी घडावे या हेतूने पुस्तकांची तुला केली. युवानेते प्रतिक पाटील व राजवर्धन पाटील यांच्याहस्ते लवकरच या पुस्तकांचे वाटप करणार आहोत - खंडेराव जाधव, नगरसेवक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com