येस बॅंकेतील 19 कोटींच्या ठेवींमुळे कोल्हापुरचे CEO गोत्यात आले असते! - minister mushriff advice right time to kolhapur zp | Politics Marathi News - Sarkarnama

येस बॅंकेतील 19 कोटींच्या ठेवींमुळे कोल्हापुरचे CEO गोत्यात आले असते!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 मार्च 2020

ग्रामपंचायत विभागाच्या 3 कोटींच्या ठेवी येस बॅंकेत अडकल्या आहेत. याबाबत मुश्रीफ यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना विचारणा केली. 

कोल्हापूर: रिझर्व बँकेने निर्बंध लादल्यामुळे चर्चेत असलेल्या येस बॅंकेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ठेवी होत्या. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यांनी वेळीच सुचना दिल्याने त्या काढून घेतल्या गेल्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावरील गंडांतर टळले आहे. 

कोल्हापुरात रविवारी होत असलेल्या महिला दिनाच्या आढावा घेण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी येस बँकेच्यासंदर्भानेही मुश्रीफ बोलले. 

मुश्रीफ म्हणाले, येस बॅंकेतील ठेवी काढून त्या जिल्हा बॅंकेत ठेवण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांना दिल्या होत्या. या बॅंकेतील 19 कोटींच्या ठेवी हस्तांतरीत झाल्या आणि या बॅकेवर निर्बंध आले. जर या ठेवी अडकल्या असत्या तर श्री. मित्तल व श्री. राजमाने यांच्यावर कारवाई झाली असती. मात्र माझ्यामुळे ही कारवाई टळली आहे, त्यामुळे त्यांनी माझे आभार मानावे, असे सांगताच सभागृहात हशा पिकला. सीएसआरमधून निधी घेण्याचे खूळ कोणी डोक्‍यात घातले आहे माहिती नाही. पण ज्या बॅंका आर्थिक अडचणीत असतात त्याच सीएसआरच्या नावाखाली निधी देतात, असा टोलाही ना.मुश्रीफ यांनी यावेळी लावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख