मंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम...

जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून आक्रमक असणारे गुलाबराव पाटील आज प्रथमच अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर होते मात्र ते खूप संयमाने वावरत होते.
 मंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम...

जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे ठेवा, नाही तर जनता तुम्हाला ठोकून काढेल, अंपगाकडून प्रमाणपत्राचे पैसे घेता? काही वाटतं का काही तुम्हाला. त्यांची तरी दुआ घ्या, यापुढे असे करू नका, शेतकऱ्यांना छळू नका, त्यांना पुरेशी वीज द्या असा सज्जड दम मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकित आज अधिकाऱ्यांना दिला. 

जळगाव जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. अध्यक्ष म्हणून त्यांची ही पहिलीच बैठक होती. यावेळी सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसल्याची तक्रार केली, तसेच शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होत नसल्याची तक्रारही केली. जिल्हा रूग्णालयात अंपगांना वैद्यकीय प्रमाणपत्र देतांना पैसे मागितले जातात असे सदस्यांनी सांगितले. 

त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी औषधांबाबत जिल्हा आरोग्यधिकाऱ्यांना सांगितले, तुम्ही आरोग्य केंद्रात ताबडतोब औषधे उपलब्ध करा अन्यथा ही जनताच तुम्हाला ठोकून काढेल, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना ते म्हणाले, शेतकऱ्यांना छळू नका, त्यांना पुरेशी वीज उपलब्ध करून द्या, जिल्हा रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चिडून विचारले, अंपगांकडून प्रमाणपत्रासाठी पैसे घेता ? तुम्हाला काही वाटले पाहिजे, त्यांचा दुआ घ्या. पुढच्या वेळेस काही तक्रारी आल्यास तुमची गय करणार नाही असा दमही त्यानीं अधिकाऱ्यांना दिला. 
जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून आक्रमक असणारे गुलाबराव पाटील आज प्रथमच अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर होते मात्र ते खूप संयमाने वावरत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com