minister farmer | Sarkarnama

 जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी चालविला औत 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 14 जून 2017

मुंबई : शेतकऱ्यांची मुले कोणत्याही क्षेत्रात सक्रिय झाली, नावारूपाला आली तरी ग्रामीण भागात शेती दिसल्यावर शेतीचे आकर्षण शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये हमखास उफाळून येतेच. त्याला मृद व जलसंधारण तसेच राजशिष्टाचार मंत्री तसेच नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे तरी अपवाद कसे राहणार. बुधवारी सकाळी पक्षसंघटनेच्या कामानिमित्त ग्रामीण भागात गेलेल्या मंत्री शिंदे यांना शेतात नांगरणी सुरू असल्याचे दिसताच त्यांनाही नांगरणीचा मोह आवरला नाही. त्यांनीही शेतात नांगरणीची आपली हौस भागवून घेतली. 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय कार्य विस्तार योजनेर्अंतगत मंत्री शिंदे यांनी अकोले तालुक्‍यातील मवेशी गावाला मंगळवारी भेट दिली. या गावातच मंगळवारी रात्री मंत्री शिंदेंचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी शिंदे यांनी मवेशी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. गावातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. वृक्षारोपण केले. त्यादरम्यान शेतामध्ये शेतकरी बैलांच्या मदतीने नांगरणी करत असल्याचे मंत्री शिंदेंना दिसून आले. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यासोबत उत्स्फूर्तपणे नांगरणी केली. मंत्री झालो असलो तरी आपण शेतकरीच असल्याचे शिंदेंनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दाखवून दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, डॉ. लहामटे, अशोक भांगरे, सिताराम भांगरे आदी उपस्थित होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख