minister dilip kamble's phone is not reachable | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

प्रकाश आंबेडकर यांच्यावरील टिकेनंतर राज्यमंत्री दिलीप कांबळे "आऊट ऑफ रेंज"

संपत मोरे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत हे जगजाहीर आहे, असे कांबळे म्हणाले होते. 

पुणे: "प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत" असा आरोप करणाऱ्या समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर नेटकऱ्यानी टीकेचा धुरळा उठवला आहे. याबाबत काहींनी कांबळे यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता 'ते आऊट ऑफ रेंज असल्याचे सांगण्यात येत होते.  

कांबळे यांनी काल नगरमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. आंबेडकर समाजात चुकीची माहिती पसरवून समाजात दुही माजवत आहेत. त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत हे जगजाहीर आहे, असे कांबळे म्हणाले होते. 

यावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यातून संताप व्यक्त होऊ लागला. अनेकांनी समाजमाध्यमातून दिलीप कांबळे यांच्यावर टिका केली. "प्रकाश आंबेडकर यांचा नक्षलवाद्यांची कसा संबंध आहे ?"हे विचारण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी कांबळे यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण ते 'आउट ऑफ रेंज' असल्याचे सांगितले जात होते. समाजमाध्यमावरून वंचित आघाडी समर्थक फ्रंटच्या प्रमुख कार्यकर्त्या डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख ,दलित युवक आंदोलनाचे सचिन बगाडे यासह  कार्यकर्त्यांनी जाहीरपणे कांबळे यांच्यावर जाहीरपणे टीका केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख