अशोक चव्हाणांनी भोकरसाठी दिले 50 लाख

विधानपरिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्याची शिफारस केली आहे.
minister ashok chavhan recommend fifty lakh for bhokar taluka
minister ashok chavhan recommend fifty lakh for bhokar taluka

नांदेड : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातील उद्‍भवलेल्या कोरोना विषाणूच्या संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

त्याचबरोबर नांदेडचे विधानपरिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनी नांदेड जिल्ह्यासाठी पन्नास लाखाचा निधी दिला आहे. तसेच नांदेड वाघाळा महापालिकेच्या कॉँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी एक महिन्याच्या मानधनाचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपुर्द केला आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२० - २१ अंतर्गत कोरोनामुळे झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्यासाठी श्री. चव्हाण यांना पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सदरील निधी भोकर विधानसभा मतदारसंघातील उद्‍भवलेल्या कोरोना संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी पन्नास लाख रुपयांची शिफारस केली आहे. याबाबतीतील एक पत्र श्री. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे सादर केले आहे.

नांदेडचे विधानपरिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्याची शिफारस केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्‍भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून देण्यात आला आहे. या निधीतून नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी समान स्वरुपात वाटप करण्यात यावा तसेच कोरोनाच्या विषाणुमुळे उद्‍भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ज्या तातडीच्या उपाययोजना करावयाच्या असतील त्यासाठी लागणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात यावे व तशी माहिती कळवावी, असेही आमदार राजूरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
 
नांदेड वाघाळा महापालिकेतील कॉँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे सात लाख १६ हजार ६६६ रुपयांच्या मानधनाचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी आमदार अमर राजूरकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com