अनिल परब यांनी लेट लतिफ अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर केले उभे

पहिल्याच बैठकीला काही अधिकाऱ्यांनी आपले गुण दाखविल्यामुळे शिस्तप्रिय पालकमंत्री चांगलेच भडकले. त्यांनी लेट लतिफ अधिकाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवत सभागृहाच्या बाहेर थांबविले.
Anil_Parab.
Anil_Parab.

रत्नागिरी :  पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी शासनाच्या खातेप्रमुखांना जिल्हा नियोजनच्या पहिल्याच बैठकीत चांगलीच शिस्त लावली. मला कोण विचारणार, अशा अविर्भावात वावरणाऱ्या दांडीबहाद्दर आणि लेट लतिफ अधिकाऱ्यांवर कारवाईच बगडा उगारला. उशिरा आलेल्या दहा ते बारा अधिकाऱ्यांना अल्पबचत सभागृहाबाहेर उभे करून ठेवले होते. 


अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यासारखी दिलेल्या वागणुकीची दिवसभर चर्चा रंगली. बैठकीला उशिरा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा परब यांनी आज दिला.


पालकमंत्री म्हणून ऍड. परब पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली होती. या आढावा बैठकीला देखील काही अधिकारी अनुपस्थित होते; मात्र परब यांनी त्यांना चांगलाच दणका दिला. बैठकीला गैरहजर असलेल्या तीन ते चार अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.


 आज येथे जिल्हा नियोजनची महत्त्वाची बैठक होती. खातेप्रमुखांबरोबर ओळख आणि जिल्ह्याचा विकास आराखडा अधिक मजबुत करण्याच्या दृष्ट्रीने प्रयत्न सुरू आहेत; परंतु या बैठकीचे गांभीर्य आणि महत्त्व नसणारे काही अधिकारी नेहमीप्रमाणे बैठक सुरू झाल्यानंतर अर्धा ते एक तासांनी आले. पहिल्याच बैठकीला काही अधिकाऱ्यांनी आपले गुण दाखविल्यामुळे शिस्तप्रिय पालकमंत्री चांगलेच भडकले. त्यांनी लेट लतिफ अधिकाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवत सभागृहाच्या बाहेर थांबविले.


बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी याची पुन्हा उजळणी केली. अनेक अधिकारी "मला कोण विचारणार, या तोऱ्यात असतात. मात्र मला कोण विचारणार नाही, असे आता समजू नये. अशा अधिकाऱ्यांबाबत मी कडक भूमिका घेणार आहे. उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई केली जाईल, असे परब यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार अतिशय उत्तम काम करीत आहे. आमच्या समान कार्यक्रमावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे पुन्हा युती होणार म्हणणाऱ्यांना आणखी पाच वर्षे वाट बघावी लागणार आहे, असा चिमटा पालकमंत्री परब यांनी काढला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com