मिनी कॅबिनेटसाठी सिंधुदुर्ग प्रशासनाची धांदल 

जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी आंगणेवाडी; तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तारकर्लीत जेथे राहणार आहेत त्या जागांची पाहणी केली.
mini cabinet meeting sindhudurg
mini cabinet meeting sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) : कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या १७ रोजी होत असलेल्या यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत आहेत. या वेळी जिल्ह्यात मिनी कॅबिनेट होणार असून, त्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धांदल उडाली आहे. 

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये 2009 मध्ये प्रवेश केल्यावर ते राज्याचे महसूलमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅबिनेट बैठक आयोजित केली होती. सिंधुदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली होती. यानिमित्त जिल्हा मुख्यालय सजविण्यात आले होते. त्यानंतर 10 वर्षांनी पूर्ण कॅबिनेट नसली तरी मिनी कॅबिनेट बैठक जिल्ह्यात होत आहे. त्या अनुषंगाने त्या वेळेच्या कॅबिनेट बैठकीत काय नियोजन करण्यात आले होते, याची माहिती घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. 

जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी आंगणेवाडी; तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तारकर्लीत जेथे राहणार आहेत त्या जागांची पाहणी केली. त्यानंतर मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील प्रशासनाची आढावा बैठक घेतली. गेले दोन दिवस जिल्हाधिकारी याच नियोजनात व्यग्र होत्या. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा सर्व डेटा तयार केला जात आहे. मुख्यमंत्री येत असल्याने त्यांच्यासमोर सर्व माहिती ठेवून जिल्हा विकासाला आवश्‍यक निधी, अपूर्ण प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प, सी वर्ल्ड, चिपी विमानतळ याचीही माहिती सादर केली जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com