जलसंधारणमंत्री राम शिंदेंची सासरवाडीच तहानलेली! सासरे सरपंच पण ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत!!

जलसंधारणमंत्री राम शिंदेंची सासरवाडीच तहानलेली! सासरे सरपंच पण ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत!!

पाटोदा : संपूर्ण पाटोदा तालुका हा दुष्काळात होरपळत असून ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये पाण्याचे प्रचड दुर्भिक्ष आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची सासरवडी असलेले व विशेष म्हणजे  सासरे गावचे सरपंच असलेल्या तालुक्यातील धनगर जवळका या ठिकाणी ऐन दुष्काळात ग्रंपंचायत कडून ग्रामस्थांना पाण्यासाठी वेठीस धरले जात आहे.

ज्याठिकणी विहीर व कूपनलिका अधिक्ग्राहित करण्यात आलेल्या आहेत त्याचे पाणी काही ठराविक लोकांनाच मिळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यामुळे  पिण्याच्या पाण्याची तत्काळ सोय करा या मागणी साथी येथील ग्रामस्थांनी 29 एप्रिल रोजी बीड नगर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

पाटोदा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील ज्याठिकणी विहीर व कूपनलिकेचे अधिग्रहण केले आहे ते रद्द करून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावात त्यांकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा त्याच प्रमाणे अधिग्रहण करण्यात आलेल्या ठिकाणचे अत्यापर्यंत ग्रामस्थांना पाणीच मिळाले नसल्यामुळे त्याचे देयके अदा करण्यात येवू नये. तरी प्रशासनाणी ग्रामस्थांची पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

पोलिसांकडून आंदोलकांना नोटिस

आंदोलनाचे लेखी निवेदन घेवून जाणार्‍या आंदोलकाणा आंदोलन न करण्यासंदभात नोटिस देण्यात आली असून आंदोलन केल्यास कायदेशीर करवाई करण्यात येईल असा ईशरा पोलिसाकडून देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com