वारीस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई

वारीस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई

मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य करणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास एमआयएम पक्षश्रेष्ठींनी मनाई केली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा येथील भाषणांत त्यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर पठाण अडचणीत आले होते. वारीस पठाण यांच्या विरोधात आज मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात वारिस पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही 15 कोटी आहोत. मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, असे चिथावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथील जाहीर सभेत केले होते. या वक्तव्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी वारिस पठाण यांच्यावर टीका केली. तर, अनेक ठिकाणी वारिस पठाण यांच्याविरोधात मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, भायखळ्यात भाजपने आज मोर्चा काढत पठाण यांचा निषेध केला. 

वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटायला सुरुवात झाले आहेत. औरंगाबाद येथे पठाण यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरला. वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनात आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वारिस पठाण यांना तडीपार करा नाहीतर तुरुंगात टाका, अशी मागणी यावेळी भाजपने केली. भाजपपाठोपाठ मनसेही आक्रमक झाली आहे. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रकाश महाजन आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नवी मुंबईत गजानन काळे यांनी पठाण यांचा निषेध नोंदवला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com