mim politics | Sarkarnama

"आप देशमुख है, तो हम भी ओवैसी है'! 

सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 9 मार्च 2017

महापालिकेत जोरदार धडक देण्याच्या तयारीत असलेल्या ओवेसींची सभा गाजली ती
कॉंग्रेसवरील हल्यामुळे. "आप देशमुख है, तो हम भी ओवैसी है' म्हणत असदोद्दीन यांनी कॉंग्रेसला ललकारले.

लातूर : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एमआयएममध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी लातुरात झालेल्या जाहीर सभेत
पक्षाचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवैसी यांनी चकार शब्दही काढला नाही. महापालिकेत जोरदार धडक देण्याच्या तयारीत असलेल्या ओवेसींची सभा गाजली ती
कॉंग्रेसवरील हल्यामुळे. "आप देशमुख है, तो हम भी ओवैसी है' म्हणत असदोद्दीन यांनी कॉंग्रेसला ललकारले. मात्र जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीनंतर दीड हजार
कार्यकर्त्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी व भ्रष्टाचाराच्या आरोपावर मात्र ते काहीच बोलले नाही. स्पष्ट आणि धडक वक्तव्य करणाऱ्या ओवैसींनी पहिल्यांदा मिडियाला
टाळल्याचे दिसले. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत एमआयएमला अपेक्षित यश मिळाले नाहीच, पण त्यांची दखल देखील मतदारांनी घेतली नाही. उलट
तिकीट वाटपासाठी कोअर कमिटीतल्या सदस्यांनी लाखो रुपये मागितल्याचे आरोप झाल्याने एमआयएम अधिक चर्चेत आली. नगरपालिका निवडणुकीतील
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एमआयएमच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी केल्याच्या निषेधार्थ शहरातील हजारो कार्यकर्त्यानी पक्षाला रामराम ठोकला. जाहीर सभेत
ओवेसी या विषयावर काही बोलतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी ते टाळले. निवडणुकीच्या तोंडावर स्वःताच्या पक्षातील भष्टाचारावर असे जाहीर सभेत बोलून ते
पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत असा अंदाज आधीच बांधण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस आणि अमित देशमुख यांना टार्गेट करत महापालिका
निवडणुकीसाठी "यल्गार' पुकारला. 
लातूरमधील भ्रष्ट सत्ता उखडून फेकण्यासाठी एमआयएमला सत्ता द्या असे आवाहन करतानाच सत्ता मिळाली की लातूरमधील साहेबांच्या नातेवाइकांना दिलेली कंत्राट
रद्द करतो म्हणत कॉंग्रेसवर टीका केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख