सीएए, एनआरसीविरोधात एमआयएम मैदानात

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)आणि नागरिक नोंदणी पुस्तिकेविरोधातील (एनआरसी) आंदोलनाचे लोण आता पिंपरी-चिंचवडला आले आहे. त्याविरोधात एमआयएमच्या मदतीला इतरही मुस्लिम संस्था,संघटना धावून आल्या आहेत. त्या कुल जमाती तंझीमच्या झेंड्याखाली आज धरणे धरणार आहेत.
सीएए, एनआरसीविरोधात एमआयएम मैदानात

पिंपरीः नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)आणि नागरिक नोंदणी पुस्तिकेविरोधातील (एनआरसी) आंदोलनाचे लोण आता पिंपरी-चिंचवडला आले आहे. त्याविरोधात एमआयएमच्या मदतीला इतरही मुस्लिम संस्था,संघटना धावून आल्या आहेत. त्या कुल जमाती तंझीमच्या झेंड्याखाली आज धरणे धरणार आहेत.

दरम्यान, बाहेरील व्यक्ती या आंदोलनात घुसून गडबड करण्याची भीती पोलिसांना वाटते आहे.त्यामुळे त्यांनी अशा व्यक्ती या निदर्शनात घुसणार नाहीत,याची काळजी घेण्यास आयोजकांना सांगितले आहे. त्या अटीवर त्यांनी या धरणे आंदोलनाला परवानगी दिली आहे. तसेच अर्धा डझन कॅमेऱ्यातून ते या आंदोलनावर नजर ठेवणार आहेत.हमारा मुल्क,हमारा नारा, सीएए हटाव मिशन हमारा ही या धरण्यातील एक घोषणा असणार असल्याचे एमआयएमचे प्रादेशिक अध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) अकील मुजावर यांनी सरकारनामाला सांगितले. 

केंद्राचा सीएए कायदा हा राज्यघटनेच्या कलम १४  व १५ उल्लंघन करणारा आहे, असे ते म्हणाले. ते भविष्यात एनआरसी ही आणणार आहे. या दोन्ही गोष्टी एका विशिष्ट समाजाच्या व भारतीय संविधानाच्या विरोधात असून एका विशिष्ट समाजाला त्रास देण्यासाठी जाणीव पूर्वक हा कायदा बनवण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला. म्हणून त्याच्या विरोधात निषेध नोंदवण्याकरिता शहर परिसरातील मुस्लिम समाज व संविधानाला मानणाऱ्या इतर सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी दुपारी २:३० ते ५:३० वेळेत भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी  येथे धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती मुजावर यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com