एमआयएमतर्फे वडगावशेरीत  डॅनियल लांडगेंना उमेदवारी 

.
MIM Owaisi
MIM Owaisi

औरंगाबादः एमआयएमने वडगांवशेरीत  डॅनियल रमेश लांडगेंना उमेदवारी जाहीर केली आहे . याशिवाय नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्यचे उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत . 

वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने स्वबळावर राज्यातील 74 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे ठरवले आहे. त्यानूसार आज औरंगाबादेत
मराठवाड्यातील नांदेड, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि पुण्याजवळील वडगांवशेरी या मतदारसंघातील 21 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या तीनही मतदरासंघातील उमेदवारीची पहिली यादी देखील प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जारी केली आहे.

त्यानूसार नांदेड उत्तर मतदारसंघातून मोहमंद फेरोज लाला, मालेगांव मध्य मुफ्ती महंमद ईस्माईल अब्दुल खालीक, तर वडगांवशेरी येथून डॅनियल रमेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील इतर मतदारसंघातील इच्छुकांच्या जिल्हानिहाय मुलाखतींचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मंगळवारी शहरातील पक्षाच्या मुख्यालयात इम्तियाज जलील यांनी नांदेड मधील 15, पुणे2, तर नाशिक येथील 4 अशा एकूण 21 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एमआयएमकडे राज्यातील 125 मतदारसंघातून तीनशेहून अधिक इच्छूक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com