प्रबळ इच्छूकांअभावी एमआयएमच्यापिंपरी-चिंचवडातील मुलाखती स्थगित 

प्रबळ इच्छूकांअभावी एमआयएमच्यापिंपरी-चिंचवडातील मुलाखती स्थगित 

पिंपरीः वंचित बहूजन विकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर एमआयएमच्या विधानसभा इच्छूकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. युती व आघाडीअभावी काही इच्छूक अजूनही कुंपणावर असल्याने एमआयएमच्या मुलाखतींना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

परिणामी पूर्वी ठरविल्यापेक्षा (वंचितमध्ये असताना) कमी जागा लढणार असल्याचे पक्षाच्या एका राज्य पदाधिकाऱ्याने सरकारनामाला सांगितले. 

दरम्यान, राज्यात विधानसभेचा पहिला उमेदवार (पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात डॅनियल लांडगे)जाहीर करून आघाडी घेणाऱ्या एमआयएमवर उर्वरित उमेदवार,मात्र आता उशीरा जाहीर करण्याची पाळी आली आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते डिक्‍लेर केले जातील, असे सांगण्यात आले. त्यामागे वंचितपासून घेतलेली फारकत व त्यामुळे कमी झालेली इच्छूकांची संख्या हे कारण असल्याचे समजते.

 त्यातूनच पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही जागा लढणार असल्याचे जाहीर केलेली एमआयएम प्रबळ उमेदवाराअभावी आता फक्त दोनच जागा लढणार असल्याचे कळते. पिंपरी सोडून ते आता चिंचवड व भोसरी लढणार आहेत,असे ऐकायला मिळाले. पिंपरी राखीव मतदारसंघात वंचितचे मतदार असल्याने भोसरी व चिंचवड या शहरातील बाकीच्या दोन मतदारसंघात एमआयएम लढेल,असा अंदाज आहे. 

सप्टेंबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज दिलेल्या राज्यभरातील इच्छूकांच्या मुलाखती सध्या औरंगाबाद येथे एमआयएमकडून सुरु आहेत. बाकीच्या इच्छूकांच्या मुलाखती नंतर घेतल्या जातील,असे पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी सांगितले.

दरम्यान, या मुलाखतींना पेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे वृत्त आहे. वंचितपासून घेतलेली फारकत हे प्रमुख कारण त्यामागे असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

दोन्ही कॉंग्रेसची जाहीर न झालेली आघाडी व शिवसेना,भाजपची न झालेली युती यामुळे काहीजण अजून कुंपणावरच आहेत.त्याचाही फटका बसलेला आहे.परिणामी प्रबळ उमेदवार अजून पक्षाला मिळालेले नाहीत.परिणामी पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही जागांवरील इच्छकांच्या मुलाखती दोन दिवस पुढे ढकलणयाची पाळी पक्षावर आली आहे.त्याला पक्षातूनच दुजोरा देण्यात आला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com