.. तर महापालिका निवडणूक पुढे ढकला - इम्तियाज जलील

 .. तर महापालिका निवडणूक पुढे ढकला - इम्तियाज जलील

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा धोका आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेली अधिसूचना पाहता, जर आरोग्य यंत्रणा, निवडणुक विभागाला अशा वातावरणात निवडणुक घेण शक्‍य वाटत नसेल तर महापालिका निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. कोरोना व्हायरसचा धोका पाहता गर्दीचे कार्यक्रम घेण्यास केंद्र सरकार व आरोग्य विभागाने मनाई केली आहे. अगदी पैठण येथील नाथष्टीची यात्रा, मांगीरबाबा यात्रा व औरंगाबादेत होणार इस्तेमा रद्द करण्यासंदर्भात तातडीची बैठक विभागीय आयुक्तांनी आज घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना खासदार इम्तियाज जलील यांनी भूमिका स्पष्ट केली. 

इम्तियाज जलील म्हणाले, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. महापालिकेने देखील मुशायऱ्याचा कार्यक्रम रद्द केला होता. एकीकडे मुशायऱ्याचा कार्यक्रम रद्द करणाऱ्या महापालिकेने पोलिसांच्या संगीत रजनी व एका खाजगी हॉटेलातील रॅप गायक बादशाह याच्या कार्यक्रमाला मात्र परवानगी दिली होती. मुशायऱ्याला वेगळा नियम आणि इतरांना वेगळा अशी दुटप्पी भूमिका महापालिका आणि पोलिसांनी घेऊ नये. इस्तेमाच्या बाबतीत आयोजक व धर्मगुरू योग्य तो निर्णय घेणार आहेतच. 

कोरोनाच्या धरतीवर महापालिका निवडणूक पुढे ढकलली जावी का ? या प्रश्नाला उत्तर देतांना निवडणूक आयोग, आरोग्य विभाग व यंत्रणेला जर असे वाटत असेल की खरंच निवडणुका घेतल्या तर कोरोनाचा धोका वाढू शकतो किंवा या जीवघेण्या व्हायरसची लागण लोकांना होऊ शकेल तर निवडणुका पढे ढकलल्या जाव्यात. सहा महिने महापालिकेवर प्रशासक नेमावा जेणेकरून चांगली कामे तरी होतील असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी लगावला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com