खासदार इम्तियाज जलील यांनी झारखंडमध्ये घेतली तबरेज अन्सारीच्या कुटुंबियांची भेट

झारखंड विधानसभेसाठी पाच टप्यात मतदान होत आहे. 'एमआयएम'ने देखील या निवडणुकीत उडी घेतली असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी बंधु यांच्या सोबतीला आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील हे देखील झारखंडमध्ये दाखल झाले आहेत.
MIM Leader Imtiaz Jaleel Met Tabrez Ansari Family in Jharkhand
MIM Leader Imtiaz Jaleel Met Tabrez Ansari Family in Jharkhand

औरंगाबाद :  खासदार इम्तियाज जलील सध्या झारखंड राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. 'एमआयएम'चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचाराची धुरा आपल्या खाद्यांवर घेतल्यानंतर इम्तियाज जलील त्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. नुकतीच त्यांनी झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा शिकार झालेल्या तबरेज अन्सारीची पत्नी आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली.

झारखंड विधानसभेसाठी पाच टप्यात मतदान होत आहे. 'एमआयएम'ने देखील या निवडणुकीत उडी घेतली असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी बंधु यांच्या सोबतीला आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील हे देखील झारखंडमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून केंद्रातील मोदी सरकार नागरिकत्व विधेयक मंजुर करून घेण्याच्या तयारीत आहे. अशावेळी इम्तियाज जलील यांनी मात्र झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्राधान्य देत दोन दिवसांपुर्वीच झारखंड गाठले. येथील प्रचार सभांमध्ये सहभागी होऊन ते भाषण देखील करत आहेत.

दरम्यान, गुरूवारी इम्तियाज जलील यांनी एका हॉटेलात तबरेजअन्सारी याच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी तरबेज अन्सारीच्या हत्येसंदर्भात न्यायलयात सुरू असलेला खटला प्रगतीपथावर असून 'एमआयएम' तबरेजच्या कुटुंबियांच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा विश्‍वास इम्तियाज जलील यांनी दिला. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com