MIM Mla ransacked Desi liqour shop in Aurangabad | Sarkarnama

एमआयएम आमदाराने फोडले देशी दारूचे दुकान

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

औरंगाबाद : शहागंज भागातील पाण्याच्या टाकीजवळ नव्याने सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानास परवानगी देऊ नका अशी मागणी करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील काही नगरसेवक व आपल्या समर्थकांसह दुपारी शहागंज भागात पोचले. लवकरच सुरू होणाऱ्या या देशी दारू दुकानाला कुलूप ठोकल्यानंतर हा जमाव चेलीपूरा येथे निदर्शने करण्यासाठी गेला. चेलीपूरा येथील दारूचे दुकान पाहून प्रक्षुब्ध झालेल्या तरुणांनी या देशी दुकानावर हल्ला चढवत दारू प्यायला आलेल्या ग्राहकांना मारहाण करत जोरदार तोडफोड केली.

शहागंज येथील पाण्याच्या टाकीजवळ नव्याने देशी दारूचे दुकान सुरू होणार असल्याची कुणकूण आमदार इम्तियाज जलील यांना लागली होती. मशीद, मंदिर, शाळा, रुग्णालयाचा परिसर व जवळच असलेल्या भाजीमंडईत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात महिला मुली व नागरिक येत असल्याने देशी दारू दुकानास परवाना देण्यात येऊ नये अशी मागणी जलील यांच्यासह या भागातील नगरसेविका खान सायरा बानो अजमल यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, निरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांना दिले होते. परंतु एवढे करूनही संबंधितास देशी दारू दुकान सुरू करण्याचा परवाना देण्यात आल्याची माहिती आमदार जलील व एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यामुळे आज सकाळीच इम्तियाज जलील, नगरसेविका खान सायरा बानो यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने शहागंज येथील प्रस्तावित दारू
दुकानासमोर जमल्या होत्या. परवाना रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत महिलांनी या दुकानाला टाळे ठोकले.

चेलीपुऱ्यात तोडफोड
शहागंज भागातील दुकानाला टाळे ठोकल्यानंतर जलील व त्यांचे समर्थक चेलीपुऱ्याच्या दिशेने निघाले. देशी दारू दुकानाच्या विरोधात निदर्शने करणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हा जमाव चेलीपुरात जमल्यावर तो तेथे सुरू असलेल्या देशी दारू दुकानावर चाल करून गेला. महिला व तरुणांनी दुकानात घुसून टेबल खुर्च्यांची तोडफोड करत तेथील ग्राहकांना देखील मारहाण करत हुसकावून लावले. दुकानातील देशी दारूचे बॉक्‍स दुकाना बाहेर आणून ते रस्त्यावर फोडण्यात आले. आमदार इम्तियाज जलील यांनी देखील यावेळी दारू पिण्यासाठी आलेल्यांना मारहाण करत दारूचे बॉक्‍स फोडले. तासभर हा गोंधळ सुरू होता. अखेर तासाभराने पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख