रुग्णालयात गोंधळ घालणारे आमदार मौलाना मुफ्ती स्वतःच झाले 'होम क्वारंटाईन'

मालेगावचे एमआयएममचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना 'होम क्वारंटाइन' राहण्याचा सल्ला महापालिका प्रशासनाने दिला आहे. बुधवारी सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गेल्या महिन्यात ते दिल्ली, आग्रा येथून परतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना हा सल्ला देण्यात आला
MIM MLA From Malegaon Home Qurantined
MIM MLA From Malegaon Home Qurantined

मालेगाव : मालेगावचे 'एमआयएमम'चे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना 'होम क्वारंटाइन' राहण्याचा सल्ला महापालिका प्रशासनाने दिला आहे. बुधवारी सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गेल्या महिन्यात ते दिल्ली, आग्रा येथून परतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना हा सल्ला देण्यात आला.

दरम्यान आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल गेल्या महिन्यात दिल्ली व आग्रा येथे गेले होते. त्यामुळे प्रशासनाला आज उपरती का सुचली? असा प्रश्न विचारला जात आहे. मुफ्ती यांनी दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी सभा घेतली. आयुक्त, अपर अधिक्षक आदींसह अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. सामान्य रुग्णालयात गर्दीने जाऊन गोंधळही घातला. दरम्यान, रुग्णालयातील गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे 'होम क्वारंटाइन' ही मौलाना मुफ्ती यांची नौटंकी असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी केला आहे.

आमदार मोलाना मुफ्ती त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या सल्ल्यानंतर शहरात वेगवेगळ्या चर्चां सुरु झाल्या आहेत. येथे अद्याप एकही कोरोना बाधीत रूग्ण नाही. विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संख्येत मात्र आज थेट चोवीस जणांची भर पडली. विदेशातील प्रवाशांची संख्या ११३ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

शहरात २४ नवे प्रवासी

शहरात नव्याने आलेले चोवीस प्रवासी प्रामुख्याने केनिया, इंडोनेशिया व दक्षिण आफ्रिकेतून आलेले आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे मुदत संपलेले क्वारंटाइन वगळता होम क्वारंटाइन असलेल्यांची संख्या ७८ झाली आहे. दिल्ली येथून आलेल्या सहा जणांचाही यात समावेश आहे. पोलिस यंत्रणेने महापालिकेला नव्याने आलेल्या प्रवाशांची यादी सोपविली. येथील सामान्य रूग्णालयात चार संशयित रूग्ण दाखल आहेत. त्यांच्या 'स्वॅब'च्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

'होम क्वारंटाईन' असलेल्यांची संख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर यांनी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सायका अन्सारी, सहाय्यक अधिकारी डॉ. भिमराव त्रिभुवन आदींसह आरोग्य विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. शहरातील मदनी नगरच्या विलगीकरण कक्षात सहा जणांना दाखल करण्यात आलेले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com