mim corporter suspend from party | Sarkarnama

शिवसेना-भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे एमआयएमचे सहा नगरसेवक निलंबित

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

औरंगाबाद : महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करून शिवसेना-भाजपला मदत करणाऱ्या व मतदानाच्यावेळी गैरहजर राहून अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या एमआयएमच्या सहा नगरसेवकांवर खासदार इम्तियाज जलील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. उपमहापौरपदासाठी एमआयएमने स्वतंत्र उमेदवार दिला असतांना देखील या पक्षाची मते फुटल्याचे निकालानंतर समोर आले आहे. एमआयएमचे जफर बिल्डर यांना पक्षाचे 24 नगरसेवक असतांना केवळ 13 मते पडली. तर तीन मते ही शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला देण्यात आली. 24 पैकी 16 जणांनी मतदानात सहभाग घेतला तर उर्वरित आठ जण गैरहजर राहिले. 

उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांचा 51 मते घेऊन विजय झाल्यानंतर एमआयएमच्या उमेदवाराला मिळालेली मते पाहून एमआयएमला मोठा धक्का बसला. एमआयएमची तीन मते फुटली त्यातील दोन शिवसेना तर एक भाजप उमेदवाराला मिळाले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममध्ये पडलेली ही फूट भविष्यात पक्षासाठी घातक ठरू शकते हे ओळखून प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करत त्यांचे प्राथमिक सदस्यत्व देखील रद्द केले. सायरा बानू अजमल खान, संगीता वाघुले, नसीम बी सांडू शेख, विकास एडके, शेख समिना, सलिमा बाबूभाई कुरेशी या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

यापुर्वी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी देखील एमआयएमच्या नगरसेवकांनी पक्ष आदेश डावलून शिवसेना महायुतीचे अंबादास दानवे यांना मतदान केले होते. त्यावेळी एमआयएमवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही एमआयएममध्ये फूट पडल्याने खासदार इम्तियाज जलील यांचा नगरसेवकांवर वचक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख