MIM to contest Pimpri chinchwad | Sarkarnama

एमआयएम पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही जागा लढणार

उत्तम कुटे 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

.

पिंपरीः वंचित आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर एमआयएमने राज्यात स्वबळावर पन्नासहून अधिक जागा लढविण्याचे ठरवले आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी,भोसरी आणि चिंचवड या तिन्ही जागांचा समावेश आहे. दरम्यान,त्यासाठी औरंगाबादच्या मुख्य कार्यालयात मुलाखतीही सुरु केल्या आहेत.

मुलाखतीसाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाझ जलील यांनी चार पदाधिकाऱ्यांची समिती तयार केली आहे. त्यात पिंपरी येथील पक्षाचे सचिव व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अकील मुजावर यांचा समावेश आहे,अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी दिली. 

वडगाव शेरी (पुणे),नांदेड व मालेगाव येथील तीन उमेदवार जाहीर केल्यानंतर राज्यातील इतर उमेदवार निश्चीतीसाठी पक्षाने आता इच्छूकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत.पहिल्या टप्यात मराठवाडा व विदर्भातील घेतल्या जात आहेत. पिंपरी ,चिंचवड व भोसरी विधानसभेमधूनही उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तेथील उमेदवारही मुलाखतीनंतर लवकरच जाहीर करण्यात येतील असे मुजावर यांनी जाहीर केले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख