MIM to contest Parbhani, Beed and Paithan | Sarkarnama

एमआयएम परभणी, बीड आणि पैठण लढविणार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

..

औरंगाबादः एमआयएमने उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी घोषित केलेल्या या यादीत मराठवाड्यातील परभणी, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचा समावेश आहे.

एमआयएमने आतापर्यंत महाराष्ट्रातील 24 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

एमआयएमने राज्यातील पन्नासहून अधिक जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आतापर्यंत पक्षाने निम्या म्हणजेच चोवीस मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. आज इम्तियाज जलील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

परभणीमधून अली खान मोईन खान, बीड-शेख शफीक मोहंमद, पैठण- प्रल्हाद राठोड या मराठवाड्यातील तीन उमेदवारांचा यात समावेश आहे. याशिवाय कामटी नागपूर-शकीबुल रहेमान, हातकणंगले- सागर शिंदे, श्रीरामपूर-सुरेश जगधने आणि धुळ्यातून डॉ. अन्वर फारूख शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख