MIM Bagged Three Seats in Jalgoan | Sarkarnama

काँग्रेसला जमले नाही ते दहा मिनीटात 'एमआयएम' ने केले 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

जळगाव महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाने तब्बल 77 जागा उभ्या केल्या होत्या. त्यापैकी त्यांना एकही जागा मिळालेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गेल्या वेळी अकरा जागा होत्या यावेळी त्यांना एकही जागा जिकंता आलेली नाही. काँग्रेस तर महापालिका स्थापनेपासूनच महापालिकेत एक नगरसेवक निवडून आणण्यासाठी धडपड करीत आहे. परंतु पंधरा वर्षात जळगावकरांना काँग्रेसच्या पंजा महापालिकेत पाठविलाच नाही.

जळगाव : काँग्रेसला दीडशे वर्षाची परंपरा आहे. त्याच काँग्रेसला जळगाव महापालिकेत पंधरा वर्षात एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. मात्र अवघे काही वर्षापूर्वी स्थापन झालेल्या एमआयएम ने अवघे सहा उमेदवार उभे करून पहिल्याच झटक्‍यात तीन उमेदवार निवडूनही आणले. खासदार असदुद्ीन ओवेसी यांच्या दहा मिनीटांच्या सभेने हा चमत्कार घडविला. विशेष म्हणजे सभेची गर्दी मतात परिवर्तीत होत नाही, असा समजही त्यांनी फोल ठरविला आहे. 

जळगाव महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाने तब्बल 77 जागा उभ्या केल्या होत्या. त्यापैकी त्यांना एकही जागा मिळालेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गेल्या वेळी अकरा जागा होत्या यावेळी त्यांना एकही जागा जिकंता आलेली नाही. काँग्रेस तर महापालिका स्थापनेपासूनच महापालिकेत एक नगरसेवक निवडूण आणण्यासाठी धडपड करीत आहे. परंतु पंधरा वर्षात जळगावकरांना काँग्रेसच्या पंजा महापालिकेत पाठविलाच नाही. यावेळी तो झटका दिला आहे. पक्षातर्फे उमेदवार रिंगणात होते. मात्र एकही निवडून आला नाही, तर समाजवादी पक्षाचीही तीच गत झाली आहे. 

ओवेसींची दहा मिनीटांची सभा
एमआयएमने जळगाव महापालिकेत सहा उमेदवार उभे केले होते. त्यामुळे त्यांना कोणीही प्रतिस्पर्ध्यांच्या गणिततही धरत नव्हते. त्यांचा एकही उमेदवार येणार नाही अशीच अनेकांची धारणा होती. अगदी प्रचारातही त्यांच्या उमेदवाराचे अस्तित्व दिसत नव्हते. प्रचार संपण्याच्या एक दिवस अगोदर पक्षाचे नेते खासदार ओवेसी यांची या उमेदवारांच्या प्रभागात सभा रात्री 8 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, ओवेसी सांगलीची सभा करून पुणे येथील कार्यक्रमातून जळगावला बाय रोड येणार होते. त्यामुळे त्यांची सभा होण्याची शक्‍यताही कमीच होती. तरीही ते येणार अशी चर्चा सभेच्या दिवशी होती, त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती, त्यात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणार होती, मात्र रात्रीचे साडेनऊ झाले तरीही ते सभास्थळी आले नव्हते. 

मात्र ते येणार असे जाहिर करण्यात येत होते. दहा वाजता सभेची वेळ संपणार होती, अगदी दहा वाजेला दहा मिनीटे कमी असतांना ते सभास्थळी आले आणि त्यांनी मोटारीमधून उतरून अगदी पळतच व्यासपीठ गाठले थेट माईक हातात घेवून भाषण सुरू केले. अगदी दहा वाजण्याला एक मिनिट बाकी असतांना सभा संपवून ते व्यासपीठावरून खाली उतरले. या सभेला प्रचंड गर्दी होती, युवकांचीही संख्या मोठी होती. तीच गर्दी मतातही 'कॅश' झाली आणि पक्षाला तीन जागा मिळून तब्बल पन्नास टक्के यश मिळाले आहे. काँग्रेसला जे सत्तेत असताना आणि नसतानाही जमले नाही ते एमआयएमचे अवघ्या दहा मिनीटांच्या सभेत करून दाखविले आहे. सभेला जमणारी गर्दी मतात परिवर्तीत होत नाही, असे अनेक वेळा म्हटले जाते. परंतु, सभेची गर्दीही मत देते हे ओवेसी यांनी जळगावात सिध्द करून दाखविले आहे.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख