मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा एमआयएमचा डाव उधळला

 मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा एमआयएमचा डाव उधळला

औरंगाबाद : महापौर परिषदेच्या निमित्ताने शहरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवण्याचा एमआयएमचा डाव पोलिसांनी उधळून लावला. रस्त्यांसाठी मिळालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून महापालिका ते आझाद चौक हा रस्ता करावा या मागणीसाठी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन व इतर कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याची गाडी अडवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभुमीवर पोलीसांनी सकाळीच मतीन यांना अटक केली. 

रस्त्यासाठी आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीवरून राजकीय पक्षांमध्ये धूसफूस सुरु आहे. एमआयएमने पक्षपातीपणाचा आरोप करत न्यायालयात धाव घेण्याचा इशारा देखील पत्रकार परिषद घेऊन दिला होता. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उद्‌घाटन करण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आज (ता. 9) शहरात येणार असल्याने त्यांची गाडी अडवून निवेदन देण्याचा इशारा एमआयएमच्या नगरसेवकांनी दिला होता. कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोलीसांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना त्यांच्या घरातूनच सकाळी अटक केली. 

बेगमपुरा पोलीस ठाण्यात त्यांना बसवण्यात आल्याने पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. महापौर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रामा इंटरनॅशनल मध्ये आलेल्या एमआयएमच्या इतर नगरसेवकांची देखील पोलीसांनी कसून चौकशी करत त्यांना गडबड कराल तर याद राखा असा दम दिला होता. महापौर घडामोडे यांनी देखील नगरसेवकांना रस्त्याचा प्रश्‍न आपण चर्चा करून सोडवू शकतो. देशभरातून आलेल्या महापौरांच्या समोर शहराची शोभा नको अशा शब्दांत त्यांना सुनावले. 

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी देखील नगरसेवकांची समजूत काढत महापौर परिषदेला हजेरी लावली. दरम्यान, महापौर परिषदेचे उद्‌घाटन होऊन मुंबईला मुंबईला परतत नाही तोपर्यंत पोलीसांनी सय्यद मतीन यांना बेगमपुरा पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com