आंबेडकरांकडून निरोप न आल्याने "एमआयएम' स्वतंत्र लढणार ?

आंबेडकरांकडून निरोप न आल्याने "एमआयएम' स्वतंत्र लढणार ?

औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. किमान 74 जागा मिळाव्यात अशी एमआयएमची अपेक्षा होती. मात्र, एमआयएमला केवळ 8 जागा देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने दर्शविल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे जागा वाटपाच्या निर्णयाची वाट पाहणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी स्वतंत्र तयारी सुरू केलीय. 

आठवडाभरापूर्वी एमआयएमचे नेते अससोद्दीन ओवेसी आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात तीन तास बंद दाराआड बैठक झाली. त्या बैठकीनंतर दोन दिवसात निर्णय कळवणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात त्यांचा निर्णय आला नसल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. बैठक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे दोन दिवसात निर्णय कळवणार होते, असे एमआयएमचे अध्यक्ष अससोद्दीन ओवेसी यांनी जलील यांना सांगितले होते. आता एमआयएमचे नेते त्यांच्या निर्णयाची वाट पहात आहेत. 

"एमआयएम' ने 2014 मधील विधानसभा निवडणुकीत राज्यात स्वतंत्रपणे 24 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागांवर विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभेत यश मिळवल्यानंतर एमआयएमनी जवळपास 98 जागा लढवण्याची तयारी केली होती. त्यात 24 ठिकाणी त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार असल्यानं 74 जागा 'वंचित'कडून मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. मात्र, पुण्यामध्ये झालेल्या बैठकीनंतरही कोणताही निरोप दिला नसल्याने एमआयएमच्या नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केलीय. दोन्ही पक्षाचे नेते समोर येऊन बोलत नसले तरी मनातली ही खदखद एमआयएमच्या नेत्यांनी ऑफ कॅमेरा बोलून दाखवली. निवडणूका जवळ येत असल्याने तयारी केव्हा आणि कशी करायची, कोण उमेदवार सक्षम असेल याची चाचपणी केव्हा करायची असे प्रश्न एमआयएमच्या नेत्यांना पडले आहेत. त्यामुळे जास्त काळ वाट पाहण्यात घालवण्याऐवजी स्वतंत्र तयारी करणे महत्त्वाचे मानले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com