मिलिंद एकबोटे आयोगासमोर साक्ष देणार नाहीत

समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी भीमा कोरेगाव दंगलींची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर साक्ष देण्यास नकार दिला.
Milind Ekbote Denies to Depose Before Bhima Koregaon Commission
Milind Ekbote Denies to Depose Before Bhima Koregaon Commission

मुंबई : समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी भीमा कोरेगाव दंगलींची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर साक्ष देण्यास नकार दिला. राज्यातील राजकीय चित्र बदलल्याने या प्रकरणीच्या तपासावर परिणाम होण्याची भीती असल्याचेही त्यांनी यासंदर्भातील आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

माजी न्यायमूर्ती जयनारायण पटेल व माजी सनदी अधिकारी सुमित मलिक यांच्या आयोगातर्फे ही चौकशी सुरु आहे. आयोगासमोर आज एकबोटे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून वरील माहिती दिली. ३१ डिसेंबर २०१७ नंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. याबाबत २०१७ ते २०१९ दरम्यान पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली होती, मात्र आता काही शक्तींना फायदा मिळावा यासाठी या चौकशीची दिशा बदलली जाण्याची शक्‍यता आहे. तपास सुरु असतानाच आता राजकीय चित्र बदलल्याने कदाचित मला यात गोवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, अशीही भीती त्यांनी या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली आहे.

या दंगलीत एकबोटे हे आरोपी आहेत, त्यांना याप्रकरणी अटक करून नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. आयोगासमोर साक्षीला न आल्याबद्दल त्यांनी आयोगाची क्षमाही मागितली आहे. आपले हित जपण्यासाठी आपण आयोगासमोर साक्ष देऊ इच्छित नाही. या प्रकरणीचा पोलिस तपास अद्याप पूर्ण झाला नसून आरोपपत्रही दाखल झाले नाही. मी या परिसरात जातीय तेढ वाढवली, असा आरोप होत होता. 

मात्र तो खोटा व राजकीय हेतूंनी प्रेरित आहे, किंबहुना एल्गार परिषद व डाव्या संघटनांनी हा हिंसाचार केल्याचा दावाही त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. आपली जात तसेच आपली राष्ट्रवादी तत्त्वे आणि मार्क्‍सवादाला विरोध यामुळे आपल्याला डाव्या तसेच नक्षली व देशविरोधी शक्तींनी घेरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com