मिलिंद एकबोटेला अखेर अटक 

मिलिंद एकबोटेला अखेर अटक 

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोप असलेले पुण्यातील मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आज एकबोटे यांच्या अंतरीम जमीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अंतरीम जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने एकबोटेंना पोलिसांनी अटक केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एकबोटेंचा जामीन रद्द व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले होते. कोरेगाव भिमा दंगलीनंतर महाराष्ट्रात प्रचंड तणावाचे वातावरण होते. या दंगलीमुळे कोट्यवधीचे नुकसानही झाले आहे. या दंगलीनंतर एकबोटे यांच्यासह सांगलीतील शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत काल मुख्यमंत्र्यांनी एकबोटेंना अटक होण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले होते. आज न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कोरगाव भीमा दंगली प्रकरणी अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये मिलिंद एकबोटे हे तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हंटले होते. या अहवालानुसार अंतरीम जमीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकबोटेना अटक केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com