Milind Awtade awarded Ph. D. | Sarkarnama

मिलिंद आवताडे यांना पीएच.डी. जाहीर

सरकारनाम ब्यूरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद चंद्रसेन आवताडे यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची पत्रकारिता आणि संवादशास्त्र विषयातील पीएच.डी. जाहीर झाली आहे.

`महाराष्ट्रातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील विकास वार्तांचा तुलनात्मक अभ्यास` हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले

मिलिंद चंद्रसेन आवताडे हे मूळचे आंधळगाव ता.मंगळवेढा, जि. सोलापूर येथील आहेत. त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागात व कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातही पत्रकारिता आणि संवादशास्त्र विषयात विद्यापीठात सर्वप्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाले होते. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये विकासवार्तांचे स्थान किती महत्वाचे आहे, त्याचा समाजावर किती सकारात्मक परिणाम होतो, याचे महत्व त्यांनी संशोधनात मांडले आहे.

 `मुंबईतील २००५ मधील महापूर व आपत्कालीन व्यवस्थापन` या विषयावरही सोलापूर विद्यापीठात त्यांनी संशोधन केले होते. देशातील अनेक विद्यापीठात त्यांनी विकास पत्रकारिता या विषयावर शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर,  पी. साईनाथ, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. धनंजय माने, डॉ. सुभाष कदम यांनी अभिनंदन केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख