`त्या फौजीला मारहाण झालेली नाही...फक्त शाब्दिक चकमक` : सातारा एसपी चौकशी करणार - mhaswad police denied beating army soldier in curfew but sp satara set up enquirery | Politics Marathi News - Sarkarnama

`त्या फौजीला मारहाण झालेली नाही...फक्त शाब्दिक चकमक` : सातारा एसपी चौकशी करणार

उमेश बांबरे
बुधवार, 25 मार्च 2020

सातारा जिल्ह्यातील या प्रकाराबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात येत आहेत. त्यामुळे नक्की काय घडले हे चौकशीतच स्पष्ट होईल. 

सातारा : पळसावडे येथील फौजी घराच्या दारात टोळके जमवून गप्पा मारत बसले होते. याबाबत पोलिसांनी त्यांना घरात जाऊन बसा असे सांगितले. यावरून पोलिस व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यांना मारहाण केली नसल्याचे म्हसवड पोलिसांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबत चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

पळसावडे येथील फौजी दत्ता अंकुश शेडगे हे सुट्टीसाठी गावी आलेले आहेत. काल सकाळी दहा वाजता त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला. याबाबत नेमकी परिस्थिती काय हे  म्हसवड पोलिसांकडून जाणून घेतले असता त्यांनी संबंधित फौजी घरासमोर टोळके जमवून गप्पा मारत बसले होते.

सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पोलिसांनी जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना घरात जाऊन बसा असे सांगितले. त्यावेळी पोलिस व त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यांना कोणीही मारहाण केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले जात आहे. यासंदर्भात साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.

 शेडगे हे कुपवाड येथे ड्युटीवर आहेत. त्यांनाच मारहाण झाल्याने सोशल मिडियात संताप व्यक्त करण्यात आला. काहींनी पोलिसांनी अतिरेक केल्याची प्रतिक्रिया दिली. तर फौजी असले तरी त्यांनी नियम पाळायला हवे, होते असा सल्ला. पोलिसांवरही कामाचा ताण आहे, हे लक्षात घ्या, असेही काहींनी म्हटले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख