म्हैसकर दांपत्याला पुत्रवियोग : मंत्रालयात हळहळ

म्हैसकर दांपत्याला पुत्रवियोग : मंत्रालयात हळहळ

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली. 22 वर्ष वयाच्या मन्मथ म्हैसकर याने केलेल्या आत्महत्येने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत तर, मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.  मन्मथ म्हैसकर याच्या निधनाने मंत्रालयात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी सात वाजन्याच्या सुमारास मन्मथ मिलिंद म्हैसकर आपला मित्र अग्रवाल याला भेटण्याकरीता जात आहे असे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर 07.30 वा च्या सुमारास दरिया महल नेपियन सी रोड, मलबार हिल, मुंबई या बिल्डिंगवरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. त्यामुळे म्हैसकर दांपत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला. म्हैसकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदनवाड़ी स्मशानभूमी इथे म्हैसकर कुटुंबाची भेट घेतली. त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, उच्च शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर आदी मंत्र्यांनीही म्हैसकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

मंत्रालयातील सनधी अधिकाऱ्यांमध्ये एक यशस्वी दांपत्य म्हणून मिलिंद म्हैसकर व मनीषा म्हैसकर ओळखले जातात. मुळचे सोलापूरचे असलेले मिलिंद म्हैसकर हे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलेच परिचित आहेत. 1992 साली मिलिंद म्हैसकर व मनिषा म्हैसकरांची 'आयएएस'ला निवड झाली होती. मसूरीमध्ये प्रशिक्षण काळातच मिलिंद म्हैसकर व मनिषा म्हैसकर यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी विवाह केला. गेल्या 25 वर्षापासून ते राज्य सरकारच्या सेवेत आहेत. म्हैसकर दांपत्य मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.  त्यांच्या मुलाच्या आत्महत्येने अवघ्या कर्माचारी वर्गावरच शोक कळा पसरली. मंत्रालयातील कर्मचारी अधिकारी या घटनेबाबत दुख व्यक्त करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com