मेट्रोमुळे खासगी वाहतूक कमी होणार : मुख्यमंत्री

मेट्रोमुळे खासगी वाहतूक कमी होणार : मुख्यमंत्री

मुंबईः शाश्वत विकास हा केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्र सरकारकडून राज्यात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मुंबईसह राज्यातील मेट्रोच्या जाळ्यांमुळे खासगी वाहतूक 35 टक्के कमी होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

एशियन इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या (एआयआयबी) वार्षिक सभेनिमित्त आयोजित "शाश्वत पायाभूत सुविधा' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. 

राज्याचा विकासदर 15 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्‍यकता आहे. वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विकासावर भर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या परिसंवादाला एशियन डेव्हलपमेंट बॅंकेचे माजी कार्यकारी संचालक पॉल स्पेझ, जागतिक बॅंकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ निकोलस स्ट्रेन उपस्थित होते. 

2025 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुंबई, नागपूर व पुणे शहरांमध्ये मेट्रोची उभारणी, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ आदी प्रकल्प सुरू केले आहेत. मेट्रोच्या जाळ्यामुळे खासगी वाहतूक कमी होऊन परिणामी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com