अंजेला मर्केल यांना इंजेक्शन देणार डाॅक्टरच कोरोना पाॅझिटिव्ह! चॅन्सेलर झाल्या क्वारंटाइन

कोरोना विषाणू युरोपात धुमाकूळ घालत असून आता जर्मनीच्या पंतप्रधानांनाही होम क्वारंटाइन व्हावे लागले.
angela merkel.
angela merkel.

बर्लिन : जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्केल या देखील आता विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरलाच करोनाची बाधा झाल्याने मार्केल यांनी हा निर्णय घेतला. 

मर्केल यांनी रविवारी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ती संपल्यानंतर त्यांना त्यांच्या डाॅक्टरविषयी माहिती देण्यात आल्याचे प्रवक्त्याने जाहीर केले. 65 वर्षीय असलेल्या मर्केल यांच्या काही नियमित तपासण्या केल्या जातील. तोपर्यंत तरी त्या घरूनच काम करणार आहेत. न्युमोनियाला प्रतिबंध करणारे इंजेक्शन मार्केल यांना या डाॅक्टरने शुक्रवारी दिले होते. मार्केल या जर्मनीच्या कणखर नेत्या समजल्या जातात. 

कोरोना प्रतिबंधासाठी लादलेले निर्बंधांना जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी त्या पत्रकार परिषदेत आभार मानले होते. तसेच सोशल डिस्टन्सिंग भर देण्याचे आवाहन करत किमान दीड मीटर (पाच फूट) अंतर राखण्याची सूचना त्यांनी केली होती. कोरोनामुळे माझेही जीवन पूर्णपणे बदलून गेले असून आता मी सर्वाधिक काळ फोनवर किंवा व्हिडीओ काॅन्फरन्समध्ये असते, असे त्यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com