मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे : राज ठाकरे 

राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते .
मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे : राज ठाकरे 

पुणे : मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे तसेच जे नर्स तुमची सेवा करतात त्यांच्यासमोर अश्‍लील चाळे करणाऱ्या आणि लोकांच्या अंगावर थुंकणाऱ्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल करायला हवेत अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली. 

पंतप्रधान नरेदद्र मोदी यांच्यावरही टीका करताना ते म्हणाले, की त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते पण, तसे झाले नाही. 
कोरोनाच्या पार्श्वभूमी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाच्या संकटात डॉक्‍टर्स, नर्स आणि माध्यमांतील मंडळी जिवावर उदार होऊन जे काम करीत आहेत त्यांची आदर व्यक्त करतानाच आपला भक्कम पाठिंबा दिला. 

मात्र मरकजप्रकरणावर राज यांनी सकडून टीका केली. ते म्हणाले, की अशा लोकांना तर गोळ्या घातल्या पाहिजे. जर तुम्ही ऐकत नसाल आणि उद्या जर एखाद्या सरकारने कठोर भूमिका घेतली तर पुन्हा ओरडू नका असा दमही त्यांनी दिला 

लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे. इतकी शांतता आपण 92-93च्या दंगलीतही पाहिली नव्हती असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते असं म्हटलं आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com