member of parliament sanjay jadhav appeals about corona virus | Sarkarnama

ही लढाई घरात बसून जिंकायची आहे : खासदार संजय जाधव

गणेश पांडे
गुरुवार, 26 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी करावे असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले आहे.

परभणी : कोरोना विषाणूपासून स्वतःला वाचायचे असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे लागेल. आपण काही दिवस घरात बसून राहिलो तर नक्कीच आपण हा लढा जिंकू, असा विश्वास परभणीचे खासदार संजय जाधव यांनी बुधवारी व्हिडिओद्वारे व्यक्त केला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी करावे असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले आहे. या संदर्भात खासदार संजय जाधव यांनी एक व्हिडिओ तयार करून सांगितले की, कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण गर्दीच्या ठीकाणी जाणे टाळावे. शहरातील मंदिरे, धार्मिक स्थळे, देवस्थान या ठिकाणी जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. शक्यतो अत्यावश्यक काम सोडून बाहेर पडू नये. प्रत्येक व्यक्ती ने दिवसभरात ८ ते १० वेळा साबणाने स्वच्छ हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, शक्यतो डोळे, चेहऱ्याला हात लावणे टाळावे, हस्तांदोलना ऐवजी दुरुन नमस्कार करावा. शिंकताना रुमाला चा वापर करावा.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख