म्हणून इम्तियाज जलील लोकसभा अध्यक्षांची सूचना ऐकण्यास तयार नाहीत!

माझा खासदार निधी माझ्याच मतदारसंघात खर्च करणार असाल तर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो.
 member of parliament imtiyaz jalil interview on development fund 
member of parliament imtiyaz jalil interview on development fund 

औरंगाबाद : पंतप्रधान सहाय्यता निधीत हा निधी दिला तर तो देशाच्या इतर भागात खर्च होईल. खासदार निधी हा त्या जिल्ह्याच्या विकासासाठी दिला जातो. आरोग्य यंत्रणा सुधारणे हादेखील विकासाचाच एक भाग असल्यामुळे तशी परवानगी मिळाली तर मी माझा खासदार निधी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यास तयार असल्याचे इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बहुतांश खासदारांनी आपला खासदार निधी आरोग्य यंत्रणांच्या विकासासाठी देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

इम्तियाज जलील म्हणाले, लोकसभा अध्यक्षांचे एक पत्र मला नुकतेच मिळाली आहे. त्यात कोरोना संदर्भात उपाय योजना करण्यासाठी आपला खासदार निधी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याची सुचवले आहे याशिवाय अर्बन डेव्हलपमेंटच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांचाही मला फोन आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांचा खासदार निधी कोरोनाच्या लढ्याविरोधात वापरण्याचा घेतलेल्या निर्णयचे मी स्वागतच करतो. परंतु खासदार निधी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याबद्दल माझे स्वतःचे काही मत आहे. प्रत्येक खासदाराला निधी हा त्याच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी दिला जातो. निश्चितच देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे, अशावेळी आरोग्य यंत्रणा अद्यावत करण्याला महत्त्व आहे .

परंतु माझ्या मतदारसंघासाठी दिला गेलेला खासदार निधी दुसऱ्या भागात किंवा राज्यात वापरण्यापेक्षा तो जर माझ्याच मतदारसंघात वापरला गेला तर त्याचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करणे सोयीचे ठरेल. खासदार निधी हा वैयक्तिक कुणाचा नसतो, तो सरकारने दिलेलाच पैसा असतो याची मला जाणीव आहे. तो पैसा लोकांच्या कामी यावा असेच मलाही वाटते. फक्त माझ्या मतदारसंघातला खासदार निधी याच ठिकाणी वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात आज सायंकाळपर्यंत मला निरोप मिळण्याची शक्यता आहे. मतदारसंघात खर्च करण्याची परवानगी मिळाली तर खासदार निधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन आरोग्य यंत्रणांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधांसाठी तो देण्यास तयार असल्याचेही जलील यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com