अण्णा, काहीबी करा पण आम्हाला बीडला न्या!

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले त्या जिल्ह्यात लोक ऊस कसे तोडतील? अशा परिस्थितीत कोण काम करेल? एका बाजूला घर सोडू नका असे सांगता आणि दुसऱ्या बाजूला ऊसतोडणी कामगारांना ऊस तोडायला चला म्हणता हे बरोबर आहे का?"
member of legislative council suresh dhas raise suger cane labour issue
member of legislative council suresh dhas raise suger cane labour issue

पुणे: "ऊसतोड कामगारांच्या इच्छेविरुद्ध त्यांना ऊस तोडायला लावू नका. ज्या सांगली जिल्ह्यात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले त्या जिल्ह्यात लोक ऊस कसे तोडतील? अशा परिस्थितीत कोण काम करेल? एका बाजूला घर सोडू नका असे सांगता आणि दुसऱ्या बाजूला ऊसतोडणी कामगारांना ऊस तोडायला चला म्हणता हे बरोबर आहे का?" असा सवाल आमदार सुरेश धस यांनी विचारला आहे.

"मला रोज सांगली, सातारा जिल्ह्यातून शेकडो फोन येत आहेत. लोक रडून सांगत आहेत,'अण्णा काहीबी करा पण आम्हाला गावाकडे न्या.' असे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

"बीड जिल्ह्यातील जे ऊस तोडणी कामगार सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गेले आहेत त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. सरकार म्हणतंय घरातून बाहेर पडू नका. घरात बसा. ज्यांना घर आहेत ते घरात बसतील. ऊसतोडणी कामगार एवढ्याशा पाल्याच्या खोपटात राहतात. त्या खोपटात दिवसभर थांबणं शक्य आहे का?"असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

"परराज्यातील कामगारांच्या साठी जेवढं सरकार संवेदनशील आहे तेवढं ऊस तोडणी कामगारांच्या बाबतीत नाही. हे ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातील आहेत. ते सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडायला गेले आहेत. त्यातील काही घरी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्याना तिथं सुरक्षित वाटत नाही म्हणून ते घराकडं येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नाकेबंदी असल्यानं घरीही येऊ शकत नाहीत."असे धस म्हणाले.

"लॉक डाऊन मध्ये सगळ्या कंपन्या बंद केल्या मग ऊस कारखाने सुरू ठेवले? इस्लामपूरच्या आसपास जे कारखाने आहेत. तिथल्या कारखान्याकडून बळजबरीने लोकांना ऊस तोडायला लावलं जात आहे. त्यामुळे लोक घाबरले आहेत. ऊसतोड कामगार म्हणजे काय मशीन नाही. त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ऊस तोडायला लावू नका."असे धस म्हणाले. 

"आता कारखाने बंद करून ऊसतोड कामगारांची  राहण्याची सोय साखर कारखान्याच्या जवळ करावी. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आज परराज्यातील कामगारांच्या साठी पॅकेज दिलं आहे तशीच तरतूद ऊसतोडणी कामगारांच्या साठी करावी. या कामगारांना रोख स्वरूपात रक्कम द्यावी." अशी मागणी त्यांनी केली. "साखर कारखान्यांना जर ऊसतोडणी कामगारांची व्यवस्था करणे जमणार नसेल तर मग सरकारने या कामगारांना आपापल्या घरी गावी जाण्याची परवानगी द्यावी.आणि त्यांना त्यांच्या गावात त्यांना वेगळे ठेवावे. ऊसतोडणी कामगारांच्या बाबतीत सरकारला योग्य निर्णय घ्यावा लागेल."असे धस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com