महादेव जानकरांनी मुंबई, पुण्याबरोबरच मिरजच्या रूग्णालयासाठी दिला निधी 

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे साहित्य या निधीतून खरेदी करावे असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनादिलेल्या पत्रात म्हटले आहे.
member of legislative council mahadev jankar recommend twenty five lakh for various hospitals 
member of legislative council mahadev jankar recommend twenty five lakh for various hospitals 

पुणे: राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या साहित्यासाठी पंचवीस लाखाची मदत जाहीर केली आहे. त्यांनी त्याबाबतचे पत्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे साहित्य या निधीतून खरेदी करावे असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आमदार जानकर यांनी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाला 10 लाख, पुण्यातील नायडू रुग्णालयाला 10 लाख तर मिरज येथील शासकीय रुग्णालयाला 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधीतून 10 टक्के निधी शासकीय मालमत्ता दुरुस्तीला देण्याची तरतूद आहे. त्या तरतुदीअंतर्गत आमदार जानकर यांनी 'संबंधित रुग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांसाठी लागणारे साहित्य खरेदी करावे' यासाठी हा निधी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com