'ते' आपल्यासाठी त्यांची सगळी दुःख विसरून रस्त्यावर उभे आहेत!

भांडण झालं पोलीस, चोरी झाली पोलीस, अपघात झाला पोलीस, बंदोबस्तासाठी पोलीस, आपत्ती आली पोलीस.... हीच यादी अशी खूप मोठी वाढवता येईल. पण आज याच पोलिसांना काही बेजबाबदार घटक त्रास देत आहेत.
member of legislative assembly rohit pawar supports pune police video
member of legislative assembly rohit pawar supports pune police video

पुणे: "पोलीस हाही एक माणूसच आहे आणि त्यालाही कुटुंब आहे, भावना आहेत. पोलिसांशी हुज्जत घालू नका. ते आपल्यासाठी त्यांची सगळी दुःख विसरून रस्त्यावर उभे आहेत," असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पुणे पोलिसांनी एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत पोलीस कोणत्या अडचणीतून कर्तव्य बजावत असतात, हे दाखवले आहे. या व्हिडिओबाबत आमदार पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"पोलीस एवढ्या तणावात असताना चुकून काही लोकांवर कारवाई होत असेल तर लोकांनीही समजून घेतलं पाहिजे," असेही पवार यांनी म्हटले आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये "भांडण झालं पोलीस, चोरी झाली पोलीस, अपघात झाला पोलीस, बंदोबस्तासाठी पोलीस, आपत्ती आली पोलीस.... हीच यादी अशी खूप मोठी वाढवता येईल. पण आज याच पोलिसांना काही बेजबाबदार घटक त्रास देत आहेत. 'लॉक डाऊन'मुळे रस्त्यावर असलेल्या पोलिसांशी अनेक लोक हुज्जत घालताना दिसतात. वास्तविक आपल्याच सुरक्षेसाठी आपलं घरदार सोडून ते रस्त्यावर उभे आहेत,"असे म्हटले आहे.

"काही पोलिसांचे आई किंवा वडील आजारी आहेत, काही महिला पोलिसांची लहान मुलं घरी आहेत, दोन-दोन दिवस त्यांची  मुलांशी भेटही होत नाहीय. डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस काम करतायेत, कोरोनाशी लढतायेत. त्यांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं याबाबत पुणे पोलिसांनी हा एक अत्यंत मार्मिक व्हिडिओ बनवला असून तो सर्वांनी पहायला हवा आणि लॉक डाऊनच्या बाबतीतच नाही तर पोलिसांना नेहमीच सहकार्य करायला हवं. कारण पोलीस हाही एक माणूसच आहे... आणि त्यालाही कुटुंब आहे.भावना आहेत."असे पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com