अन्न धान्य घेवून बदनापूरचे आमदार नारायण कुचे पालावर पोचले!

लॉकडाऊनच्या काळात आपल्या मतदारसंघात बाहेरून आलेलं तसेच जिल्ह्यातील एकही कष्टकरी मजूर कुटुंब उपाशीपोटी राहू नये यासाठी बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी साडे सात हजार कुटुंबाना दोन आठवडे पुरेल एवढ्या अन्न धान्याचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
narayan kuche
narayan kuche

जालना : लॉकडाऊनच्या काळात आपल्या मतदारसंघात बाहेरून आलेलं तसेच जिल्ह्यातील एकही कष्टकरी मजूर कुटुंब उपाशीपोटी राहू नये यासाठी बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी साडे सात हजार कुटुंबाना दोन आठवडे पुरेल एवढ्या अन्न धान्याचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

लॉकडाऊन असेपर्यंत या गरजू कुटुंबाना अन्न धान्य पुरवठा करण्यात येणार असल्याचे कुचे यांनी सांगितले. अंबड शहरात विविध भागात पाल ठोकून राहणारे जवळपास तीनशे कुटुंब आहेत. सर्कशीचे खेळ दाखवून, तर कुणी छोटया मोठ्या वस्तू बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 

लॉकडाऊनमुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने नगरसेवक धर्मराज बाबर यांनी या सर्व कुटुंबाच्या परिस्थितीबाबत आमदार नारायण कुचे यांना कळवले. कुचे यांनी बदनापूर मतदारसंघातील अशा सर्व कुटुंबाच्या अन्नधान्याची जबाबदारी उचलली आहे. आजपासून पालावर व झोपडपट्टीत राहणाऱ्या शेकडो कुटुंबाला दोन किलो तांदूळ व पाच किलो गहु वाटप केले जात आहे. तसेच हे धान्य दळून आणण्यासाठी जवळच एका गिरणीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 

काही कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना पुन्हा अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी रासायनिक द्रव्याची फवारणीही करण्यात आली. मतदारसंघात अशी वस्ती करून राहणाऱ्या सर्व कुटुंबाना अन्न धान्य वाटप करण्यात येत असल्याचे कुचे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com