नाईलाजाने घरी बसलोय, पण 24 तास फोन चालू ठेवलाय : भास्कर जाधव

कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी नेहमीप्रमाणे वाढू लागल्याने कार्यालय बंद करण्याची विनंती अधिकार्‍यांनी केली. त्यांची विनंती योग्य असल्यामुळे मी माझे संपर्क कार्यालय बंद केले.
bhaskar jadhav
bhaskar jadhav

चिपळूण (रत्नागिरी): मला घरात बसायची सवय नाही पण लॉकडाऊनच्या काळात मी फिरत राहिलो तर लोकांच्या मनातून कोरोनाबद्दलची भिती निघून जाईल. त्यामुळे नाईलाजाने घरी बसलोय. पूर्वी 18 तास फोन चालू असायचा आता 24 तास फोन चालू ठेवलाय, असे  गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

ते म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात मी माझ्या संपर्क कार्यालयात बसून प्रशासकीय अधिकारी, मतदार आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधत होतो. मात्र कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी नेहमीप्रमाणे वाढू लागल्याने कार्यालय बंद करण्याची विनंती अधिकार्‍यांनी केली. त्यांची विनंती योग्य असल्यामुळे मी माझे संपर्क कार्यालय बंद केले. पण घरात बसण्याची सवय नसल्यामुळे मन अस्वस्थ होत आहे. कुटूंबात राहून वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय पण लक्ष मतदारसंघावर आहे. कार्यकर्ते आणि मतदारांचे फोन येत आहेत. त्यांना लागणारी मदत शासकीय आणि खासगी यंत्रणेमार्फत देण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वी माझा मोबाईल 18 तास चालू असायचा. कोरोना हा आजार उपचाराच्या पलिकडचा आहे. लोकांमध्ये जावून प्रबोधन करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे आता 24 तास फोन चालू ठेवला आहे. लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करतोय. मतदार संघातील गरजू लोकांना जेवण, औषध आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या मतदार संघातील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स यांच्यावर पूर्ण विश्‍वास आहे. त्यांच्याशी मी डिजीटलच्या माध्यमातून संवाद साधत आहे. कोरोनाच्या निमित्ताने लोकांना स्वच्छतेची सवय लागल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.  

जतला सावरायला खूप वेळ लागेल! वाचा...
पुणे : 'आई जेऊ घालिना आणि बाप भिक मागून देईना', अशी आमच्या तालुक्याची अवस्था झाली आहे. आम्हाला फक्त कोरोनाशी लढावं लागत नाही. दुष्काळ अगोदरच आमच्या पाचवीला पुजला आहे. आम्ही दुष्काळात होरपोळतोय. आता त्यात कोरोना आलाय. पुढं काय होणार आहे, आमच्या वाटयाला अजून कोणती दुःख येणार आहेत या चिंतेने मी अस्वस्थ आहे, असे जतचे आमदार विक्रम सावंत यांनी सांगितले.

आमदार सावंत जत तालुक्यावर झालेल्या कोरोनाच्या परिणामाविषयी बोलत होते. 'मी खूप काळजीत आहे. पण लोकांना सोबत घेऊन सगळे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझा तालुका दुष्काळी आहे. सततच्या दुष्काळाला कंटाळून लोकांनी जगण्याचे अनेक पर्याय निवडले आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com