आमदार मेघना बोर्डीकरांनी म्हटले 'जय श्रीराम'

आमदार मेघना यांनी शपथ पूर्ण करतांना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रसोबत जय श्रीराम हा उल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधले.
Meghana sakore bordikar
Meghana sakore bordikar

परभणी :  जिंतूर - सेलू विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी बुधवारी (27) आमदार पदाची शपथ घेतली. शपथेच्या सरते शेवटी त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रसोबत जय श्रीरामचा देखील उल्लेख केला.

राज्यातील महिन्या भराच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यातील 288 नवनिर्वाचित आमदारांचा शपथ विधी पार पडला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्ता स्थापन करणार आहे.

बुधवारी झालेल्या आमदारांच्या शपथ विधी कार्यक्रमात निरनिराळ्या गोष्टी पहावयास मिळाल्या. त्यात जिंतूर - सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी देखील त्यांच्या पदाची शपथ घेतली.

आमदार मेघना यांनी सर्वांप्रमाणेच शपथ घेतली परंतू शपथ पूर्ण करतांना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रसोबत जय श्रीराम हा उल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधले. आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलेला उल्लेख मतदार संघात चर्चेचा विषय ठरला होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com