मेघना बोर्डीकर साकोरेंच्या विजयाचा सासुरवाडीत जल्लोष

मेघना बोर्डीकर साकोरेंच्या विजयाचा सासुरवाडीत जल्लोष

शिक्रापूर : जिंतूर (जि. परभणी) या मतदारसंघातून कडवी लढत देत विधानसभेत पोहोचलेल्या मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या विजयाचा जल्लोष त्यांच्या सासुरवाडीत म्हणजे पुणे जिल्ह्यातील केंदूरमध्ये जोमात झाला.

सौ. मेघना साकोरे या रेल्वे पोलिस दलाचे पुणे विभागाचे आयुक्त दिपक साकोरे यांच्या पत्नी असून साकोरे कुटुंबीयांचा केवळ केंदूर गावातच नाही शिरुर तालुक्याच्या राजकारणातही दबदबा आहे.  याच गावचे बापूसाहेब थिटे हे शिरूर तालुक्याचे सभापती, आमदार, गृह राज्यमंत्री, खासदार अशा पदांवर होते. त्यांच्यानंतर केंदूरच्या व्यक्ती म्हणून मेघना या आमदार झाल्या आहेत. 

गावातील थिटे व साकोरे असे दोन मोठे जथ्थे आणि दोन्ही जथ्थे एकमेकांचे दुध-भाऊ संबोधले जात असल्याने दोघांमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाही.  थिटेंच्या सर्व राजकीय प्रवासात गावातील साकोरेंची साथ उत्तम राहिली. याच ऋणाची उतराई आता थिटेंनीही केली आणि दिवंगत बापूसाहेब थिटेंचे चिरंजीव डॉ.राजेंद्र थिटे यांचेसह थिटे परिवारानेही मेघनताईंच्या प्रचारात हिरीरीने भाग घेत केंदूरला पुन्हा एकदा विधानसभेत एंट्रीची मिळवून दिली. गावात काल संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या विजयाचा जल्लोष केंदूरमध्ये पाहायला मिळाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com