कोपर्डीचे बलात्कारी लवकरात लवकर फासावर लटकवा: मेघना बोर्डीकर

देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी ही घटना आहे.
meghana bordikar demand  execution of kopardi verdict 
meghana bordikar demand execution of kopardi verdict 

परभणी : दिल्ली येथील बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी फासावर लटकविण्यात आल्याने निर्भया व तिच्या कुटूंबियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आता प्रतिक्षा आहे ती कोपर्डीच्या ताईला न्याय मिळण्याची. त्यामुळे राज्यशासनाने तातडीने या प्रकरणी पावले उचलणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर बहुप्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना शुक्रवारी, दि. 20 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आले. दोषींना फाशी झाल्यानंतर संपूर्ण देशात समाधानाची भावना व्यक्त केली. या संदर्भात जिंतूर सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर - साकोरे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी ही घटना आहे. निर्भयाला न्याय मिळाला, आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची आहे. कोपर्डीचे बलात्कारी नराधमसुद्धा लवकरात लवकर फासावर लटकले पाहिजेत. त्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना आमच्या माता भगिनीवर वाईट नजरेने बघण्याचे धाडस सुध्दा झाले नाही पाहिजे, असे आमदार बोर्डीकर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com