नागपूर अधिवेशनाचा कालावधी मुंबईत ठरणार

मंगळवारी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईला होणार आहे.
meeting on nagpur assembly session
meeting on nagpur assembly session

नागपूर : नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील, यावरून अद्याप संभ्रम कायम आहे. सध्या एकाच आठवड्याचे कामकाज ठरले आहे. उद्या मंगळवारी मुंबईला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून यात अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल निर्णय घेण्यात येईल. विरोधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे अधिवेशनाच्या कामाकाजाबाबत विरोधी पक्ष काय भूमिका घेते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. विरोधकांच्या धारदार प्रश्‍नांनाही त्यांना सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री याला कशा प्रकारे प्रतिउत्तर देतात, हे ही पाहणे तितकेच औत्सुक्‍याचे ठरणार आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचेच असणार असल्याची चर्चा आहे. यावरुन सरकारवर टीकाही होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागपुरातील पहिले अधिवेशन सव्वा दोन आठवडे चालले होते. त्यामुळे यावेळी किमान दोन आठवडे तरी अधिवेशन चालावे, अशी मागणी विदर्भातील जनतेची मागणी आहे. 

मंगळवारी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईला होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष नेते व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते. ख्रिसमस पूर्वी अधिवेशन संपविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे एकच आठवडा हे अधिवेशन चालणार असल्याच्या चर्चा आहे. यापूर्वी एकदा अधिवेशन सहाच दिवस चालले आहे. विरोधी पक्षाने आग्रही भूमिका घेतल्यास अधिवेशनाच्या कामकाजात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com