समरजित घाटगे यांचे शेट्टींसोबत स्नेहभोजन; वाढदिवसाचे निमित्त 

राजू शेट्टी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितघाटगे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. नागाळा पार्क येथील श्री. घाटगे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर या दोघांनी एकत्रित स्नेहभोजनही केले
Raju Shetty Meets Kolhapur BJP President Samarjeet Ghatge
Raju Shetty Meets Kolhapur BJP President Samarjeet Ghatge

कोल्हापूर : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व 'शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत स्नेहभोजन केले. श्री. घाटगे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला या दोन नेत्यांत काल (ता. 18) रात्री दीर्घ चर्चा झाली. चर्चेच्या केंद्रस्थानी शेतकरी प्रश्‍न, कर्जमाफी आदि विषय होते.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपावर नाराज असलेल्या श्री. शेट्टी यांनी दोन्ही कॉंग्रेसला साथ दिली. लोकसभेत स्वतः श्री. शेट्टी यांचा पराभव झाला पण विधानसभेतही त्यांच्या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात कृषीमंत्री पदासाठी श्री. शेट्टी यांचे नांव चर्चेत होते. पण त्यांच्या पक्षाला मंत्रीमंडळातच नव्हे तर मंत्रीमंडळाच्या शपथविधीलाही निमंत्रण दिले नाही. त्यातून श्री. शेट्टी यांनी उघड नाराजीही व्यक्त केली होती.

या पार्श्‍वभुमीवर श्री. शेट्टी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष घाटगे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. नागाळा पार्क येथील श्री. घाटगे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर या दोघांनी एकत्रित स्नेहभोजनही केले. या भेटीमध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि अडचणी, राज्यातील सध्याचे साखर कारखानदारीतील प्रश्न, सध्याची राजकीय परिस्थिती, शासनाने जाहीर केलेली अन्यायकारक व फसवी कर्जमाफी, वीज दरवाढ या विषयावर जवळपास तासभर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना निवडणुकीआधी जाहीर केलेली कर्जमाफी मिळावी व त्यांना सातबारा कोरा करून मिळावा यासाठी श्री. घाटगे यांनी अलिकडेच आंदोलन केले होते. त्याला श्री. शेट्टी यांनी पाठिंबा दिला.

शेट्टींना सोबत घेऊन काम करू-घाटगे

''माझे वडील कै. विक्रमसिंह घाटगे व शेट्टी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शेतकरी प्रश्नावर दोघांची भूमिका व दिशा एकच होती. म्हणुनच शेट्टी यांची भेट घेऊन माझ्या कार्याचा केंद्राबिंदू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बरोबरीने काम करूया म्हणून त्यांना विनंती केली. श्री. शेट्टी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक ताकदीने मी लढू शकेन हे निश्‍चित,'' अशी प्रतिक्रिया समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com