Good News : हे औषध ठरतयं कोरोनावर परिणामकारक #fightagainstcorona

कोरोनावर औषध शोधण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. डाॅक्टर मंडळी सध्या अस्तित्त्वात असलेल्या औषधांमधून कोणते औषध या रुग्णांवर परिणामकारक ठरेल यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात मलेरियाविरोधी औषध जास्त उपयोगी असल्याचे दिसून आले आहे.
medicine for corona
medicine for corona

पॅरिस : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना सहा दिवसांत बरे करणारे औषध सापडल्याचा दावा फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ॲझिथ्रोमायसिन यांच्या संयोगाने तयार केलेले औषध हे कोरोनाचा संसर्ग बरे करण्यासाठी परिणामकारक आहे.

बाधितांवर उपचार करत असताना हायड्रॉक्सिक्लोरिन प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आले आहे. अनेक संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत असताना नियमित उपचारपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. मात्र, फ्रान्समधील संशोधक दीदियार राओल्ट यांनी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत औषध सापडल्याचा दावा केला आहे.

कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णाला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ॲझिथ्रोमायसिन यांच्या संयोगाने तयार केलेले औषध दिल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या संशोधनातही वरील औषध उपचारांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले होते. या औषधामुळे संसर्ग पसरण्याचा धोका टाळता येतो आणि प्रतिकारशक्तीही वाढते, असा दावा करण्यात आला आहे.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध मलेरीयावर उपचारासाठी वापरले जाते. ॲझिथ्रोमायसिन हे अॅंट बॅक्टेरियल म्हणून ओळखले जाते. कोरोना हा विषाणूजन्य आजार आहे. मात्र त्यासोबत काही रुग्णांना बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर ॲझिथ्रोमायसिन औषधही उपयोगी ठरू शकते, त्यामुळे दोन्ही औषधे देण्याकडे डाॅक्टरांचा कल आहे. अद्याप याला कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने उपचार म्हणून मान्यता दिलेली नाही. मात्र एक उपयुक्त प्रयोग म्हणून वैद्यकीय क्षेत्रात त्याची चर्चा आहे. मलेरियाविरोधातील औषधे कोरोना रुग्णांवर परिणामकारक ठरत असल्याचा अनुभव अमेरितेकही येत आहे. भारतात अद्याप या औषधांचा प्रयोग सुरू झाला नसल्याचे सांगण्यात आले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com