medha president | Sarkarnama

आतातरी मेढ्याला नगराध्यक्ष मिळेल का ? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 मे 2017

मेढा नगरपंचायतीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण असलेल्या अनुसूचित जमातीचा एकही उमेदवार िरंगणात नसल्याने नगराध्यक्षपदाची जागा रिक्‍तच राहिली. आता रिक्‍त जागेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांत लढत होत आहे. 

सातारा : मेढा नगरपंचायतीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण असलेल्या अनुसूचित जमातीचा एकही उमेदवार िरंगणात नसल्याने नगराध्यक्षपदाची जागा रिक्‍तच राहिली. आता रिक्‍त जागेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांत लढत होत आहे. 

मेढा हे जावली तालुक्‍याचे मुख्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी तेथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी (एसटी) जाहीर झाले. मात्र नगरसेवकपदासाठी जी जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होती, त्या जागेवर पात्र उमेदवारांअभावी निवडणूकच झाली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मेढ्यात अनुसूचित जमाती अधिकृत कागदपत्रे असलेले लोक नाहीत. जे लोक आहेत, ते अशिक्षित असून त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. त्यामुळे निवडणुकीसाठी पात्र उमेदवार मिळू शकले आहेत. शिवाय जे अर्ज भरले होते, तेही छाननीत बाद झाले. 

त्यामुळे नगरपंचायतीच्या स्थापनेपासून नगराध्यक्षपदाचा पेच निर्माण झाला आहे. आता त्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आयात उमेदवाराचा अर्ज भरला आहे. तसेच त्याचा अर्ज बाद झाल्यास अडचण होऊ नये म्हणून त्यांनी आणखी एक डमी अर्ज भरला आहे. तर खूप मेहनत करून शिवसेनेला एक उमेदवार मिळाला आहे. पण यापैकी कोण विजयी होणार, यावर मेढ्याचा नगराध्यक्ष ठरणार आहे. शिवसेनेला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख