Medha Kulkarni waiting for fulfillent of promise given by bjp leaders | Sarkarnama

मेधा कुलकर्णींना प्रतिक्षा विधान परिषदेच्या आश्‍वासन पूर्तीची!

उमेश घोंगडे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर पदावरून झालेले नेते सध्या काय करत आहेत, याचा `सरकारनामा`ने घेतलेला आढावा...

पुणे : कोथरूड मतदारसंघातील अनेक लोक आजही माझ्याकडे कामे घेऊन येतात. माझ्या परीने त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करते. आमदारांच्या पातळीवरील प्रश्‍न पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवते. उर्वरित वेळेत महाविद्यालयाचे प्राचार्यपद व पीएच. डीचे काम सुरू आहे, अशी माहिती कोथरूडच्या माजी आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांनी दिली.

सार्वजनिक कामात त्या व्यस्त असल्या तरी निवडणुकीच्या काळात पक्षाने त्यांना दिलेल्या "विधान परिषदे'च्या आश्‍वासन पूर्तीची त्या मनातून प्रतिक्षा करीत आहेत.

विधानसभा निवडणुकीवेळी कोथरूडच्या उमेदवारीवरून बरीच चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांची उमेदवारी अचानकपणे उमेदवारी जाहीर झाली. त्यावर राज्यभर चर्चा झाली. सर्व विरोधकांनी एकत्रित येत पाटील यांचा पराभव करण्याचा चंग बांधला. आमदार कुलकर्णी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या साऱ्या प्रस्तावांना त्यांनी नकार दिला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर माध्यमांपासून काहीशा दूर असलेल्या माजी आमदार कुलकर्णी यांनी "सरकारनामा'शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "" सुरवातीपासूनच मी सेवासदन अध्यापिका विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करते. मधल्या काळात काही वर्षे "लिन' घेतली. याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून गेल्यावर्षी नियुक्ती झाली. आता प्राचार्यपदाच्या कामाबरोबरच पीएच.डी. पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. "पुणे जिल्ह्यातील विविध स्तरातील शाळांची शैक्षणिक गुणवत्तावाढ' या विषयात पुणे विद्यापीठात त्या पीएच. डीचे संशोधन करीत आहे, असे त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा-खोबरे घालते किसून; शिवाजीराव आले फाॅर्च्यूनरमधूनमध्ये बसून

एकनाथ खडसेंचे सध्या तरी हरी हरी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख