Medha Gadgil transferred again | Sarkarnama

 निवृत्तीच्या उंबरठ्यावर मेधा गाडगीळ यांची पुन्हा बदली 

सरकारनामा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

.

मुंबई  :  राज्याच्या पहिल्या मराठी महिला मुख्य सचिवपदाचा मान हुकलेल्या आणि सनदी अधिका-यांत सदया सर्वांत जेष्ठ असलेल्या मेधा गाडगीळ यांची राज्य सरकारने राज्य वित्तीय महामंडळाच्या चेअरमनपदी नियुक्‍ती केली आहे. 

गाडगाळी यांच्या निवृत्तीला काही दिवस उरले असताना सरकारने त्यांना साईड केले असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. यापदावर नियुक्‍ती करण्यापूर्वी गाडगीळ मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव पदी कार्यरत होत्या. 

गाडगीळ यांच्याबरोबर सरकारने निधी पांडे यांची याच मंडळाच्या सदस्य सचिव म्हणून नेमणूक केली आहे. तर जळगावचे जिल्हाधिकारी के.डी. निंबाळकर यांची मंत्रालयात महसूल व वनविभागात सचिवपदी आणले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख